लोकसभेत पेपरफुटीविरोधी विधेयक मंजूर!

गदारोळानंतर सभागृह तहकूब, आता राज्यसभेची परीक्षा

    दिनांक :29-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Anti-paper-fraud bill passed in Lok Sabha संसदेच्या लोकसभेत प्रचंड गदारोळाच्या वातावरणात सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, २०२६ आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. आता या विधेयकावर पुढील चर्चा आणि मंजुरीसाठी ते राज्यसभेत मांडले जाणार आहे. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सरकारच्या वतीने चर्चेला उत्तर देताना विधेयकाची भूमिका स्पष्ट केली. चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली, तर सत्ताधारी सदस्यांनी त्याला तीव्र विरोध केला. त्यामुळे सभागृहात मोठा गदारोळ झाला आणि कामकाज काही काळासाठी ठप्प झाले.
 
 

papaer 
या विधेयकावर चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने शिक्षण क्षेत्रातील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या घटनांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. प्रियंका गांधी यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनीही सभागृहाबाहेर शिक्षणमंत्र्यांना लक्ष्य केले. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या प्रकाराला चारित्र्यहननाचा प्रयत्न असल्याचे म्हटले.विरोधी पक्षांनी पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील कारवाई आणि परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी यावरून सरकारवर निशाणा साधला. एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा संदर्भ बांगलादेश आणि नेपाळमधील आंदोलनांशी जोडला, तर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी शिक्षणमंत्र्यांवर टीका केली. विधेयक मंजूर झाल्यानंतरही सभागृहातील गोंधळ कायम राहिल्याने लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले. आता हे विधेयक पुढील प्रक्रियेसाठी राज्यसभेत सादर करण्यात येणार असून, तेथील चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.