बाभुळगाव येथे सराफा दुकान फोडून 18 लाखांचा मुद्देमाल लंपास

    दिनांक :29-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
बाभुळगाव,
theft-in-a-bullion-shop : भर वस्तीतील सराफा व्यवसायीचा दुकानाचा कुलूप कोंडा तोडून दुकानात प्रवेश करत अनोळखी चोरट्याने 18 लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना सोमवार, 27 जुलै रोजी सकाळी शहरातील मुख्य बाजारपेठेत उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली.
 
 
theft-in-a-bullion-shop
 
 
बाभुळगाव शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या ज्वेलर्समध्ये चोरट्यांनी हात साफ केला आहे. या घटनांमुळे सराफा व्यवसायींमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाभुळगावचे राहिवासी, हल्ली यवतमाळात राहणारे जितेंद्र तातेड यांचे धनश्री ज्वेलर्स बाभुळगाव मुख्य बाजारपेठेत आहे. शनिवारी रात्री दुकान बंद करून तातेड यवतमाळला गेले होते. रविवारी दुकान बंद असल्याने ते बाभुळगावला आले नाही. सोमवारी सकाळी त्यांच्या दुकानासमोर दुकान असलेल्या व्यवसायींनी त्यांच्या दुकानाचे कुलूप उघडे असल्याची माहिती फोनवरून दिली.
 
 
त्यानंतर तातेड यवतमाळहून तातडीने बाभुळगाव येथे आले. पोलिस उपविभागीय अधिकारी, यवतमाळ एलसीबी प्रमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी बाभुळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार दीपमाला भेंडे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.