बिहारमध्ये TRE-4 शिक्षक भरतीची घोषणा

32,388 पदांवर होणार नियुक्ती

    दिनांक :29-Jul-2026
Total Views |
बिहार
bihar tre-4 teacher बिहारमध्ये शिक्षक भरतीच्या चौथ्या टप्प्याला (TRE-4) अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी बुधवारी (29 जुलै) या भरतीची घोषणा केली असून, या प्रक्रियेद्वारे राज्यात एकूण 32,388 शिक्षक पदे भरली जाणार आहेत.
 

bihar news, tre-4 recruitment, teacher vacancy, bpsc recruitment, bihar teacher bharti, govt jobs, education news, teacher jobs 2026, bihar government jobs, recruitment update, teaching jobs, exam notification 
मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी आपल्या एक्स (X) हँडलवरून याबाबत माहिती देताना सांगितले की, TRE-4 अंतर्गत 32,388 शिक्षकांच्या नियुक्तीसाठी शिक्षण विभागाने अधियाचना बिहार लोक सेवा आयोगाकडे (BPSC) पाठवली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देणे, तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि विकसित बिहारचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.
या भरतीमध्ये इयत्ता 1 ते 5 साठी 3,847 पदे, इयत्ता 6 ते 8 साठी 8,563 पदे, इयत्ता 9 ते 10 साठी 3,877 पदे आणि इयत्ता 11 ते 12 साठी 16,101 पदे निश्चित करण्यात आली आहेत. अशा प्रकारे चौथ्या टप्प्यातील शिक्षक भरतीत बिहारमध्ये एकूण 32,388 पदांवर नियुक्ती केली जाणार आहे.
मुख्यमंत्री सम्राट चौधरी bihar tre-4 teacher  यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सरकार तरुणांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि बिहारच्या शिक्षण व्यवस्थेला नव्या उंचीवर नेण्यासाठी सातत्याने कटिबद्ध आहे.मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे शिक्षक भरतीची अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. भरतीसंदर्भातील अधिकृत जाहिरात ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, विद्यार्थी नेते दिलीप कुमार यांनी बिहारच्या शिक्षणमंत्र्यांना इशारा देत मागणी केली आहे की, TRE-4 ची जाहिरात एकल परीक्षेच्या पद्धतीनेच जारी करण्यात यावी. अन्यथा राजीनामा देण्याची तयारी ठेवावी, असा इशाराही त्यांनी दिला आहे.