डिजिटल युगातही ‘सायफळ’ नेटवर्कच्या प्रतीक्षेत

    दिनांक :29-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
पारवा, 
saifal-village : घाटंजी तालुक्यातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेला लागून असलेले शेवटचे गाव ‘सायफळ’ आजही मोबाईल नेटवर्कच्या प्रतीक्षेत आहे. देशात सर्वत्र मोबाईल आणि इंटरनेट सेवा विस्तारत असून सायफळ येथे मात्र अद्यापही कोणत्याही कंपनीचे नेटवर्क उपलब्ध झाले नाही.
 
 
 
jhk
 
 
 
यामुळे दैनंदिन संपर्कासाठी आणि ऑनलाईन कामांसाठी ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून गावात मोबाईल टॉवर उभारण्यात यावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. भौगोलिक परिस्थितीमुळे अडचणीसायफळ हे गाव विदर्भ आणि मराठवाड्याच्या वेशीवर, दुर्गम भागात वसलेले शेवटचे टोक आहे. डोंगराळ आणि सीमावर्ती भाग असल्यामुळे येथे मोबाईलचे सिग्नल पोहोचत नाहीत.
 
 
गावात साधा फोन करण्यासाठी किंवा कोणाशी संपर्क साधण्यासाठी नागरिकांना, तरुणांना गावाबाहेरील उंच टेकडीवर किंवा झाडांचा आसरा घ्यावा लागतो. आपत्कालीन प्रसंगी किंवा रात्रीच्या वेळी कोणाशी संपर्क साधायचा असल्यास मोठी अडचण निर्माण होते. सध्याच्या काळात शिक्षण आणि शेतीविषयक अनेक बाबी ऑनलाईन झाल्या आहेत. मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे गावातील शाळकरी मुले आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहिती मिळवण्यात अडथळे येत आहेत.
 
 
तसेच शेतकèयांना पिकांची माहिती, बाजारभाव किंवा शेतीशी संबंधित इतर कामांसाठी गावाबाहेर नेटवर्क असलेल्या ठिकाणी जावे लागते. नेटवर्क अभावी गावातील अनेक डिजिटल कामे वेळेवर पूर्ण होऊ शकत नाहीत. गावात नेटवर्क नसल्यामुळे शेतकèयांना शेतीशी संबंधित प्रत्येक कामासाठी, पीकविमा भरण्यासाठी किंवा सातबारासाठी 10 ते 15 किलोमीटर दूर असलेल्या कुर्ली किंवा पारवा या गावांमध्ये जावे लागते.
 
 
साध्या कामासाठीही एवढा प्रवास करावा लागत असल्याने वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो. सायफळला तत्काळ मोबाईल टॉवर उभारून ही समस्या दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने शेतकरी अशोक बंडेवार यांनी केली आहे.