विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

सर्वम बोरेलेचा वाढदिवस साजरा

    दिनांक :29-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
पांढरकवडा, 
distribution-of-educational-materials : येथील प्रख्यात सामाजिक कार्यकर्ता रजनीकांत बोरेले यांचा मुलगा सर्वम याचा वाढदिवस गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्याचा संपूर्ण संच वाटप करून साजरा करण्यात आला. पहिली ते सातवीत शिकणाèया 150 मुलामुलींना सर्वम बोरेलेच्या हस्ते हे साहित्य वाटप करण्यात आले.
 
 
y29July-Borele
 
 
सर्वम बोरेलेचा हा वाढदिवस पांढरकवडा नगर परिषदच्या दीनदयाल उपाध्याय मराठी शाळा क्रमांक 2 मध्ये करण्यात आला. महत्वाचे म्हणजे याच शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना मागील 18 वर्षांपासून शिक्षण साहित्य संच, दप्तर, लंच बॉक्स आणि सावित्रीबाई फुले शासकीय दत्तक योजनेंतर्गत गरीब विद्यार्थी यांचे शिक्षणाचा भार रजनीकांत बोरेले उचलत आहेत.
 
 
या प्रसंगी सर्वमची आई नीता बोरेले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. रजनीकांत बोरेले यांनी शैक्षणिक, आध्यामिक, विनोद आणि सामाजिक विषयांवर केलेल्या मार्गदर्शनाने मुलांची मने जिंकून घेतली. यावेळी शिक्षक राधिका पलकुलवार यांनी प्रास्ताविकातून रजनीकांत बोरेले यांनी वेळोवेळी या शाळेतील विद्यार्थ्यांना केलेल्या मदतकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी मुख्याध्यापक दिनेश सातुरवार यांनीसुद्धा बोरेले यांच्या कार्याची प्रशंसा करून आभार मानले.
 
 
यावेळी राजू बोरेले, शिक्षक घनश्याम काकडे, प्रवीण लोहवे, किशोर तडस, धर्मसिंग राठोड, शिवम बोरेले, गणेश सिंघाणिया, शुभम केळापुरे, दिलीप धामेचा, स्मित झांजरिया, बंटी बोरेले, विशाल बोरेले, अक्षय पिपलवा, वासुदेव राठोड, विक्रांत बोरेले, दिनेश कस्तुरवार, प्रथमेश सिंघानिया, नरेश सुराणा, एकांश मडावी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.