तभा वृत्तसेवा
नेर,
dnyaneshwar-sontakke : 64 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत नागपूर विभाग चंद्रपूर केंद्रातून ज्ञानेश्वर सोनटक्के यांना रंगभूषा पारितोषिकाने सन्मानित करण्यात आल्याने नेरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या गेला आहे.
प्रशांत गोडे दिग्दर्शित ‘विठो रखुमाय’ या नाटकासाठी ज्ञानेश्वर सोनटक्के यांना महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित राज्य नाट्यस्पर्धेत सर्वोत्कृष्ट रंगभूषा पारितोषिक प्रदान करण्यात आले. नागपूर येथे आयोजित विभागीय पारितोषिक वितरण समारंभात त्यांना सन्मानित करण्यात आले.
त्यांच्यावर नाट्य क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ज्ञानेश्वर सोनटक्के यांना सलग तिसèया वर्षी पारितोषिक मिळाले आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुळकर्णी आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले.
राज्य नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सहभागी झालेल्या सर्व संस्था व कलाकार यांनी मेहनत घेऊन सादर केलेल्या सर्व दर्जेदार नाटकांना प्रेक्षकांनी चांगली दाद दिली. भविष्यातही संस्था व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केली.