कराडच्या दूध भेसळखोरांवर 'FDA'चा फास!

    दिनांक :29-Jul-2026
Total Views |
कराड,
milk-adulterators : नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दूध भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आक्रमक पावले उचलली आहेत. कराड तालुका आणि लगतच्या परिसरात दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली असून संशयित केंद्रांवर करडी नजर ठेवली जात आहे.
 

fda 
 
 
 
दुधाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले
 
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कराड तालुक्यातील विविध दूध संकलन केन्द्रे, डेअरी आणि वाहतूक करणाऱ्या वाहनांची अचानक पाहणी केली. या कारवाईदरम्यान दुधाचे अनेक नमुने (सॅम्पल्स) ताब्यात घेण्यात आले असून ते तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोष आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
 
भेसळ आढळल्यास थेट गुन्हा दाखल होणार
 
दुधात पाणी, युरिया, डिटर्जंट किंवा इतर घातक रसायने मिसळून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल इशारा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित दूध मिळावे यासाठी ही मोहीम यापुढेही सातत्याने राबवली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
 
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
 
दूध खरेदी करताना नागरिकांनी त्याचा दर्जा तपासावा आणि दुधात कोणत्याही प्रकारची भेसळ असल्याचा संशय आल्यास तात्काळ अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.