वाशीम,
guru purnima 2026 गुरुपौर्णिमा हा फार महत्त्वाचा दिवस आहे.या दिवशी साधकांनी आपल्या जीवनात अधिक शुचिता येण्यासाठी गुरुगृही सेवा केली पाहिजे.आपली उपासना ही गुरोपदिष्ट असली पाहिजे व नित्य नियमाने केली पाहिजे.साधकांचा भर हा आपल्या विहित कर्मावर असला पाहिजे. विहित कर्मा शिवाय साधनेला पूर्णता नाही म्हणून साधकांनी गुरूमुखी असलेली उपासना विहित कर्मासह करावी त्याने जीवनात सुख प्राप्त होते असे उद्बोधन प.पू. विजयकाका पोफळी महाराज यांनी येथे श्री वासुदेव आश्रमात गुरुपौर्णिमा दिनी साधकांना मार्गदर्शन करताना केले.
देवकार्य हे देशकार्य आहेच पण राष्ट्रकार्य करण्यासाठीही प्रथम आपल्या परंपरेचा आचारधर्म आपण कसोशीने पाळला पाहिजे.जीवनात ज्ञान मिळविण्यासाठी प.प.टेबे स्वामी महाराजांनी जो आचारधर्म आम्हाला सांगितला आहे त्याचे पालन आम्ही जीवनात केले पाहिजे.आपल्या परंपरेचा मूळ आधार हा आचारधर्म आणि उपासना आहे.आमचा आश्रम हा कर्मासाठीच आहे, म्हणून विहित कर्म करणे फार आवश्यक आहे असेही ते म्हणाले.
आमचा आचारधर्म हाच मुख्य धर्म आहे.प.पू.पंडितकाका धनागरे महाराजांचा या आचारधर्मावर फार निष्ठा होती व तीच त्यांनी आम्हा सर्वांना सांगितली आहे. यातून आम्ही कर्मकांडी नव्हे तर कर्मनिष्ठ आहोत.आणि आमचे जे काही कर्म घडते ते भतीयुत अंत:करणाने घडले पाहिजे असे सांगून प.पू.विजयकाका पोफळी महाराज पुढे म्हणाले की,भती ही मुतीचा आई आहे व म्हणून उत्तम कर्म करणे आवश्यक आहे.आमच्यात तेच चैतन्य आहे ही धारणे करणे म्हणजेच वेदांत होय असेही ते म्हणाले.
आपल्या कर्माने चित्तशुद्धी करून जिवाचे कल्याण व्हावे असे वाटत असेल तर प्रत्येकाने नित्यकर्म करणे जरूरी आहे.विशेष म्हणजे थोरल्या स्वामी महाराजांनी नवविधा भती मध्ये स्मरण भतीला प्राधान्य दिले आहे.आपल्या जीवनात भगवंताचा आधार असणे फार महत्त्वाचे आहे व हीच बाब गुरुपौर्णिमा दिनी लक्षात ठेवून तसे वागोव असेही प.पू.विजयकाका पोफळी महाराजांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमास अनेक भाविक व साधक उपस्थित होते.