दिग्रस भाजपाकडून गुरूपौर्णिमा उत्सव

विविध धार्मिक कार्यक्रम

    दिनांक :29-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
दिग्रस, 
digras-bjp : दिग्रस भारतीय जनता पार्टीकडून बुधवार, 29 जुलैला गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र सण गुरूपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सण, उत्सवांचे जनजागरण करण्यात आले.
 
 
 
y29July-Digras
 
 
 
अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणाèया गुरूंप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करताना गुरुपौर्णिमेनिमित्त संतश्री गुरू रोहिदास महाराज समरसता संकल्प अभियानाची सुरवात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून भाजपाच्या पदाधिकाèयांनी केली.
 
 
संत रोहिदास महाराजांचा मुख्य उपदेश मानवता, समता आणि शुद्ध भक्ती या मूल्यांवर आधारित होता. त्यांनी समाजात मानवी बंधुभाव, कर्माची शुद्धता आणि प्रामाणिकपणाचा संदेश दिल्याची माहिती शहराध्यक्ष अभय इंगळे यांनी दिली. हा कार्यक्रम येथील भाजपा कार्यालयात पार पडला.
 
 
येथील ग्रामदैवत संतश्री घंटीबाबांचे पूजन करून श्री खंडेराया देवस्थानचे गुरुवर्य दत्तात्रय काळे महाराज यांचे पूजन व ग्रामीण भागातील वाईमेंढी येथील संत बलखंडे महाराजांचे पूजन यासोबतच प्रत्येक सण हा केवळ धार्मिक विधी नसून तो मानवी नातेसंबंध आणि संस्कृतीचा जिवंत उत्सव आहे, अशी जनजागृती करून गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.
 
 
गुरुपौर्णिमा उत्सवात भाजपा तालुकाध्यक्ष अरुण राठोड, शहराध्यक्ष अभय इंगळे, महिला आघाडी शहराध्यक्ष जागृती मेहता, रमेश करवा, प्रमोद बनगिनवार, सुभाष काटेकर, विष्णू राठोड, तूफान काशीकर, मंदा श्रीवास व स्वप्नील राठोड यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.