नागपूर,
guru purnima गुरुदेव सेवा मंडळ शाखा हावरापेठ रमेश मेहर यांच्या निवास्थानी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आले.पहाटे ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले.सकाळी सामुदायिक ध्यान साधना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे व अधिष्ठानाचे पूजन गुरुदेव सेवा मडंळाचे प्रचारक रमेश मेहर यांच्या हस्ते करण्यात आले.सामुदायिक ध्यान,भजनाचे सादरीकरण करण्यात आले.

गुरुपौर्णिमा या विषयावरील चिंतनावर मिरा मोतीकर म्हणाले मनुष्याने शरीरातील काम,क्रोध,लोभ,मोह,मद,आणि मत्सर या षड्विकारावर विजय मिळविल्या शिवाय गुरुदेवांची प्राप्ती शक्य होत नाही.गोकुळातील गोपी प्रमाणे नि: स्वार्थ भावनेने आणि अखंड श्रद्धेने गुरुदेवाची भक्ती केल्यास जीवनांतील कोणत्येही संकट सहज पार करता येते. पण हे तेव्हाच होईल जेव्हा आपण त्या गुरुदेवाला समर्पित होऊ तेव्हाच भगवंताची प्राप्ती होईल.असे प्रतिपादन करण्यात आले.उपस्थीत गुरुदेव भक्तांनी आध्यात्मिक लाभ घेऊन गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला.शेवटी आरती व प्रसादाचे वितरण करण्यात आले आणि शेवटी राष्ट्रवंदनाने समारोप करण्यात आले.याप्रसंगी -माधुरी मेहर,सिमा बुटले,मिरा मोतीकर,तुळशा गायकवाड,मनोहर मोरे उपस्थित होते.
सौजन्य: रमेश मेहर, संपर्क मित्र