हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील पवित्र नदीचं विक्राळ रुप

    दिनांक :29-Jul-2026
Total Views |
जळगाव
hatnur dam मुसळधार पावसामुळे भुसावळ परिसरातील हतनूर धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून वाढत्या पाण्याचा विसर्ग सुरळीत ठेवण्यासाठी धरण प्रशासनाने धरणाचे चार दरवाजे उघडले आहेत. या दरवाजांद्वारे सुमारे ५ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे
 

hatnur dam gates opened as heavy rainfall raises water storage in bhusawal 
धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने तापी नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या असून परिस्थितीवर सातत्याने बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.धरण परिसरात पाण्याचा प्रवाह वाढल्याने नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये तसेच नदीपात्रात उतरणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. संबंधित यंत्रणा परिस्थितीचा नियमित आढावा घेत असून आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत.दरम्यान, पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामानाच्या अंदाजातून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची आवक आणखी वाढू शकते. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या भागातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.