नाला सफाईअभावी जगदिशनगर पाण्यात

    दिनांक :29-Jul-2026
Total Views |
नागपूर,
jagdishnagar प्रभाग क्रमांक १२ मधील जगदिशनगर परिसरात नाल्याची वेळेत सफाई न झाल्याने नागरिकांना पावसाच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. पावसाळ्यापूर्वी नागपूर महानगरपालिकेकडून नाल्याची साफसफाई करण्यात न आल्याने मुसळधार पावसानंतर नाल्याचे पाणी थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले.
 
jagdishnagar
 
सामाजिक कार्यकर्ते सतीश घवघवे यांच्या घराजवळील नाला कचरा आणि गाळाने भरल्याने पाण्याचा प्रवाह थांबला. परिणामी, परिसरातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. यामुळे नागरिकांचे जीवनावश्यक साहित्य, अन्नधान्य आणि घरातील इतर वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत संबंधित प्रशासनाने तातडीने नाल्याची साफसफाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नाल्याचे मजबुतीकरण आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सतीश घवघवे आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे.
सौजन्य: शिवशंकर ताकतोडे, संपर्क मित्र