बुलढाणा,
shrivardhan-girhe : महाराष्ट्र शासनाच्या वतीने २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र बुद्धिमत्ता शिष्यवृत्ती परीक्षेत येथील विवेकानंद गुरुकुंज विद्यालयाचा श्रीवर्धन हर्षवर्धन गिर्हे यांने जिल्हा केंद्रातून चौथा क्रमांक प्राप्त करीत चमकदार कामगिरी केली.
श्रीवर्धन गिर्हे हा इयत्ता चौथीचा विद्यार्थी असून या शिष्यवृत्ती परीक्षेत २०० पैकी १२६ गुण प्राप्त झाले असून बुलढाणा जिल्हा केंद्रातून चौथा क्रमांक तर राज्यातून ३५ वा क्रमांक त्याने प्राप्त केला आहे. तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या घेण्यात आलेल्या इयत्ता चौथीची शिष्यवृत्ती परीक्षेत तो शिष्यवृत्तीसाठी सुद्धा पात्र ठरला आहे. विवेकानंद गुरुकुंज विद्यालयाचे मुख्यध्यापक गजानन इंगळे यांच्या हस्ते प्रमापणपत्र व सन्मान चिन्ह देऊन श्रीवर्धन गिर्हे याचा गौरव करण्यात आला. त्याने आपल्या यशाचे श्रेय आजोबा क्रिडा शिक्षक गजानन गिर्हे वडील हर्षवर्धन गिर्हे, आई शितल गिर्हे व शिक्षकवृदांना दिले आहे.