बुलढाणा,
mass-rally-in-buldhana : महाराष्ट्र शासनाने अनुसुचित जातीच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ रद्द करावी शासनाने नियुक्त केलेल्या माजी न्यायमूर्ती अनंत बदर आयोगाचा अहवाल तात्काळ सार्वजनिक करून समिती रद्द करावी अनुसुचित जाती समाजाची जातिनिहाय सामाजीक शैक्षणिक व आर्थिक स्थितीचा व्यापक सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा त्यानुसार शासकीय निमशासकीय अनुषेश पदभरती करण्यात यावी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व वसतीगृहे, कौशल्य विकास योजना स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणााच्या सुविधाांसाठी विशेष उपाय योजना करण्यात यावा या मागणीसाठी बुलढाणा येथे दि. २९ जुलै रोजी दुपारी भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

जिजामाता प्रेक्षागार येथे स्वयंस्फूर्तीने अनुसुचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या या मोर्चात तरूण विद्यार्थी,महिला, मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात उपवर्गीकरण विरोधातील फलक व रथासह घोषणादेत हा मोर्चा संगम चौक, जयस्तंभ चौक मार्गे बाजार लाईन,जनता चौक, कारंजा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात माजी खा. जोगेंद्र कवाडे, आनंदराज आंबेडकर, खा. चंद्रकांत हांडोरे, अमन आंबेडकर, आ. सिद्धार्थ खरात, पॅथर दिपक केदार, भाई अशांत वानखेडे, भाई प्रदिप अंभोरे, माजी जिप सदस्य दिलीप जाधव, तसेच चर्मकार संघटनेचे काटकर, डी. आर. माळी, लक्ष्मण घुमरे, मेहतर संघटनेचे पाचरवाल यासह समस्त आंबेडकरी समुदाय मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.