फरार टिप्पर चालकाला पोलिसांनी पकडले

राजापेठ उड्डाणपुलावरील अपघात

    दिनांक :29-Jul-2026
Total Views |
अमरावती, 
tipper-driver : मंगळवारी राजापेठ उड्डाणपुलावर घडलेल्या भीषण अपघातात टिप्परच्या धडकेने दोन महिलांचा मृत्यू झाला होता तसेच टिप्परचालक फरार झाला होता. या टिप्परचालकाला बुधवारी, २९ जुलैला राजापेठ पोलिसांनी अटक करून त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
 
 
 
JK
 
 
 
बडनेराकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर मंगळवारी हा अपघात झाला. माहिती मिळताच घटनास्थळी राजापेठचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण ताफ्यासह पोहोचले. घटनास्थळी एक टिप्पर व दुचाकी यामध्ये अपघात झाल्याचे निदर्शनास आले तसेच यात दोन महिला गंभीर होऊन रस्त्यावर पडल्याचे दिसले. मात्र, रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या टिप्परने अपघात घडवून आणला तो विना नंबरचा होता व त्याचा चालकही फरार झाला होता. मात्र, त्याच्या इंजिन व चेसिस नंबरवरून पोलिसांनी मालकाचा शोध लावला. त्यानंतर टिप्परचालक शोएब अख्तर शेख अन्सार, रा. नवसारी, अमरावती याला अटक करण्यात आली.