बुलढाणा,
prataprao-jadhav : बुलढाणा जिल्हा केंद्रीय बँकेच्या संचालकपदी केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे खा. प्रतापराव जाधव यांची अविरोध निवड झाली आहे.
बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक मर्यादित बुलढाणा या ग्रामीण क्षेत्राशी नाळ जुळलेल्या बँकेच्या संचालक मंडळ निवडीसाठी निवडणूक होऊ घातली आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृषी पतपुरवठा संस्था संचालक निवडीसाठी केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खा. प्रतापराव गणपतराव जाधव यांनी नामांकन अर्ज दाखल केला होता तर याच संवर्गातून माधवराव गणपतराव जाधव आणि दत्तात्रय उखंडराव शेळके यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु २९ जुलै रोजी माधवराव जाधव आणि दत्तात्रय शेळके यांनी आपला नामांकन अर्ज मागे घेतल्यामुळे केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची केंद्रीय बँकेच्या संचालक पदावर अविरोध झाली आहे.
खा. प्रतापराव जाधव यांचा बुलढाणा जिल्हा केंद्रीय बँकेत नेहमीच सक्रिय सहभाग राहिला आहे यापूर्वी जिल्हा केंद्रीय बँकेचे उपाध्यक्षपदी भूषविले आहे एकदा जिल्हा परिषद सदस्य तीन वेळेस आमदार राज्याचे राज्यमंत्री आणि सलग चौथ्यांदा खासदार व आता देशाचे केंद्रीयमंत्री म्हणून कार्यरत असलेले खा. प्रतापराव जाधव जिल्हा केंद्रीय बँकेच्या निवडणुकीतही अविरोध निवडून आले आहेत.