‘कमळी’मध्ये शशांक केतकरची दमदार एन्ट्री

शिक्षणाच्या व्यापारीकरणाविरोधात उभा राहणार नवा संघर्ष

    दिनांक :29-Jul-2026
Total Views |
मुंबई
shashank ketkar  झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’ नेहमीच समाजातील वास्तववादी विषयांना कथानकाच्या माध्यमातून स्पर्श करत आली आहे. आता मालिकेत विद्यार्थी आणि पालकांच्या आयुष्याशी थेट संबंधित असलेल्या शिक्षण व्यवस्थेतील वाढता व्यावसायिक दृष्टिकोन या महत्त्वाच्या विषयावर भाष्य करण्यात येणार आहे. या नव्या कथानकाला अधिक प्रभावी वळण देण्यासाठी मालिकेत एका दमदार पात्राची एन्ट्री होणार असून, अभिनेता शशांक केतकर ‘रितेश सरपोतदार’ ही भूमिका साकारताना दिसणार आहे.
 

shashank ketkar enters zee marathi 
‘कमळी’च्या कथेत प्रवेश करणारे रितेश सरपोतदार हे पात्र शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाकांक्षा, स्पर्धा आणि व्यवसायीकरणाचे प्रतिनिधित्व करणारे आहे. या भूमिकेबद्दल बोलताना शशांक केतकरने झी मराठीवर पुन्हा परतताना आनंद व्यक्त केला. ‘कमळी’सारख्या लोकप्रिय मालिकेचा भाग होण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी झी मराठी, निर्माते आणि प्रेक्षकांचे आभार मानले.
रितेश सरपोतदार हे पात्र shashank ketkar वेगळ्या छटा असलेले आणि आव्हानात्मक असल्याचे शशांकने सांगितले. महाविद्यालय, शिक्षण, विद्यार्थी आणि पालक हे विषय आपल्यासाठी कायमच जवळचे राहिले असल्याचे त्याने नमूद केले. आजच्या काळात शिक्षणाकडे व्यवसाय म्हणून पाहण्याची मानसिकता वाढत असल्याचे सांगत, अशा प्रवृत्तींमध्ये विद्यार्थ्यांची स्वप्ने, पालकांचे कष्ट आणि त्यांच्या भावनांना किंमत नसते, अशी भूमिका त्याने व्यक्त केली.‘पैसे द्या आणि यश मिळवा’ या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करणारा रितेश सरपोतदार हा महत्त्वाकांक्षी आणि कठोर स्वभावाचा व्यक्ती असल्याचे शशांकने सांगितले. मात्र, एक अभिनेता म्हणून केवळ पात्राची नकारात्मक बाजू दाखवण्यापेक्षा तो असा का बनला, त्यामागची कारणे आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले.आतापर्यंत प्रेक्षकांनी कमळीची प्रामाणिकता, अभ्यासू वृत्ती आणि सचोटी अनुभवली आहे. आता याच गुणांच्या जोरावर ती प्रभावशाली आणि स्वार्थी रितेश सरपोतदारचा सामना कसा करते, हे मालिकेतील पुढील प्रवासाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.रितेश सरपोतदारच्या आगमनामुळे कमळीच्या आयुष्यात कोणते नवे संकट उभे राहणार? विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या व्यवस्थेविरोधात कमळी कोणती भूमिका घेणार? तिची प्रामाणिकता आणि जिद्द या नव्या आव्हानासमोर टिकून राहणार का, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.