वाशीम,
pradeep joshi जवळपास १ हजार वर्षे पर्यंत आमच्यावर विदेशी आक्रमण होवून अनेक वर्षे गुलामीत काढावी लागली तरी यातूनही भारतीय संस्कृती टिकून राहिली आहे.इतकेच नव्हे तर आता आमच्या देशाने गेल्या ११ वर्षांत अचाट प्रगती केली आहे. इतया वर्षात गुलाम राहिलेला हा देश इतका विकास कसा काय करू शकतो या कल्पनेने विदेशी शती धास्तावल्या असून भारताचा विकास होवू नये, त्याची प्रगती होवू नये म्हणून विदेशी श ती दररोज नवनवे कारस्थान भारताविरूद्ध रचत आहे. याला तोंड देण्यासाठी व विदेशी शक्ती व त्यांच्या हस्तकांचे हे मनसुबे हाणून पाडण्यासाठी व या वैचारिक लढाईसाठी सार्या भारतीय समाजाने एकत्र येवून पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन रा.स्व.संघाचे सहप्रचार प्रमुख प्रदीप जोशी यांनी येथे केले.

ते येथील प.पू.पंडितकाका धनागरे महाराज व प.पू.विजयकाका पोफळी महाराजांनी उभारलेल्या श्री वासुदेव आश्रमात साधकांना मार्गदर्शन करताना २८ जुलै रोजी बोलत होते. आमच्या देशाच्या मूळ संस्कृतीचा प्राचीन असा प्रवाह अखंडित ठेवण्यासाठी इतिहासात अनेक महापुरूषांनी प्रयत्न केलेत व म्हणूनच आपली संस्कृती आजही टिकून आहे.विशेष म्हणजे यात महिलांचेही योगदान भरपूर आहे. समाजातल्या सामान्य व्य तींच्या सहकार्यातून आमचा हा देश आत्ता या स्थितीला पोहोचला आहे असेही ते म्हणाले.
भारताचा विचार हा आध्यात्माचा विचार असून ते आमचे पेटंट आहे. हीच आमची विशेषता आहे.आमची संस्कृती ही सर्व हितकारक,सर्वस्पर्शी आणि सार्वकालिक आहे.जगात इतरांजवळ ही बाब नाही, असे सांगून प्रदीप जोशी पुढे म्हणाले की, आमच्याा सामाजिक,धार्मिक आणि आर्थिक क्षेत्राचा आधार हा आध्यात्माचाच आहे.आमचे आध्यात्म समाजातील सर्व वर्गापर्यंत पोहाचविण्याची आमच्या समाजात आंतरिक व्यवस्था होती असेही अरूणाचल,नागालँडचे उदाहरणासह त्यांनी सांगितले.
आमचे व्यक्तीत्व हिंदू आहे व ते आमच्या महातपस्वी ,महापराक्रमी अशा पूर्वजांनीच निर्माण केले आहे. आमच्या पूर्वजांनी समाजासमोर विश्व मांगल्याचे स्वप्न दिले आहे. सर्वांनी विश्वशांतीचीच शिकवण दिली आहे.आम्ही इतया वर्षांत कधी कुणावरही आक्रमण केले नाही.अध्यात्माच्या माध्यमातून जगाला ज्ञान दिले व त्यांना आपलेसे केले आहे.आमचा धर्म हा वैश्विक असून तो आम्ही विश्वाशी जोडला आहे असे प्रदीप जोशी म्हणाले.
आम्ही देशात एकता एकात्मता ठेवली तरच हा देश व समाज सुरक्षित राहील.स्वकालीन धर्माचे पालन करताना समाजाचे रक्षण झाले पाहिजे. जोवर आमचा समाज सचेत होणार नाही तोवर या देशाच्या समस्या सुटणार नाहीत असे सांगून ते पुढे म्हणाले की, नुकतेच दिल्लीत जे आंदोलन झाले ते या विदेशी षड्यंत्राचाच एक नमूना आहे. केवळ सरकार किंवा लष्कर हे समाजाचे रक्षण करू शकत नाही.त्यासाठी समाजाने जागृत सतर्क राहून एकत्र येवून कार्य करणे जरूरी आहे असेही प्रदीप जोशी म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजित कोठीवान यांनी केले. कार्यक्रमास प.पू.विजयकाका पोफळी महाराज व इतर साधक वर्ग उपस्थित होता.