विद्याथ्र्यांनी सेवाभाव अंगिकारावा: पं. अग्निहोत्री

    दिनांक :29-Jul-2026
Total Views |
पुलगाव,
agnihotri विद्याथ्र्यांनी स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर व सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा आदर्श स्वीकारून शिस्त, ज्ञान, राष्ट्रभाव, एकत्व आणि सेवाभावाचा अंगीकार करावा, असे प्रतिपादन पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी केले. स्थानिक गांधी सिटी पब्लिक स्कूलमध्ये २७ रोजी आयोजित हाऊस इन्व्हेस्टिचर समारंभात ते बोलत होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापक अभिजित रघुवंशी उपस्थित होते.
 
agnihotri
 
पं. अग्निहोत्री पुढे म्हणाले, स्वामी विवेकानंद यांच्याकडून विद्याथ्र्यांनी आत्मशिस्त आणि त्याग शिकावा. टागोरांच्या सर्जनशीलतेतून आणि मानवीत्त्वाच्या विचारांतून कला व विज्ञान यांचे समतोल साधून ज्ञानविकासावर लक्ष केंद्रित करायला हवे. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा लोकशिक्षण आणि सामाजिक सुधारणेचा दृष्टिकोन लक्षात घेता सेवा आणि समाजाभिमुख शिकवणी विद्याथ्र्यांच्या चरित्रनिर्माणासाठी आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
 
 
प्रास्ताविक मुख्याध्यापक धनंजय शिंगनजुडे यांनी केले. त्यानंतर हेड बॉय म्हणून वेदान्त टिकले आणि हेड गर्ल म्हणून आदिश्री देशमुख यांची निवड करण्यात आली. तसेच टागोर, राधाकृष्णन, पटेल आणि विवेकानंद हाऊसच्या कॅप्टन, व्हाईस कॅप्टन व इतर विद्यार्थी पदाधिकार्यांना बॅज प्रदान करून पद व गोपनीयतेची शपथ दिली. संचालन सचिन उमप यांनी केले.