तारक मेहता का उल्टा चष्मा मधल्या बापूजींचे २८३ मुंडणांचे रहस्य चर्चेत

    दिनांक :29-Jul-2026
Total Views |
मुंबई
taarak mehta ka ooltah chashmah सब टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने तब्बल १८ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. २८ जुलै २०१८ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या मालिकेने गेल्या अनेक वर्षांत प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. मालिकेची लोकप्रियता आजही कायम असून, १८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने निर्माते असित कुमार मोदी यांनी कलाकारांसोबत सेटवर मोठा जल्लोष केला.
 

taarak mehta ka ooltah chashmah completes 18 years: amit bhatt 
या खास सेलिब्रेशनच्या वेळी मालिकेतील कलाकारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जेठालालच्या वडिलांची भूमिका साकारणारे अभिनेते अमित भट्टही उपस्थित होते. पापाराझींनी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ टिपले. याचदरम्यान मेकअप रूमकडे जात असताना अमित भट्ट यांचा एक वेगळाच लूक समोर आला आणि तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.
मालिकेत अमित भट्ट taarak mehta ka ooltah chashmah  हे जेठालालचे वडील चंपकलाल गडा म्हणजेच बापूजींची भूमिका साकारतात. या भूमिकेत ते नेहमी गांधी टोपीमध्ये दिसतात. मात्र, जेव्हा त्यांनी ही टोपी काढली तेव्हा त्यांचे दाट काळे केस दिसून आले. कानाजवळील केसांना पांढरा रंग देण्यात आला असून, त्यामुळे त्यांना बापूजींचा खास लूक मिळतो.काही वर्षांपूर्वी अमित भट्ट यांनी बापूजींच्या भूमिकेसाठी थेट टक्कल केले होते. एका मुलाखतीत त्यांनी या लूकमागची रंजक कहाणी सांगितली होती. मालिकेच्या सुरुवातीच्या काळात ते सर्व भागांचे शूटिंग विग घालून करत होते. मात्र, कॅमेऱ्यावर हा लूक नैसर्गिक वाटत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सलूनमध्ये जाऊन केस कापण्याचा निर्णय घेतला.बापूजींच्या भूमिकेसाठी अमित भट्ट यांनी एक-दोन नव्हे, तर तब्बल २८३ वेळा मुंडण केल्याचा खुलासा त्यांनी केला होता. त्यानंतर एका एपिसोडमध्ये त्यांनी गांधी टोपी घातली आणि तेव्हापासून त्यांचा हा खास लूक मालिकेचा अविभाज्य भाग बनला.
विशेष म्हणजे, पडद्यावर taarak mehta ka ooltah chashmah  अमित भट्ट हे जेठालालच्या वडिलांची भूमिका साकारत असले तरी प्रत्यक्ष आयुष्यात ते अभिनेता दिलीप जोशी यांच्यापेक्षा वयाने लहान आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’पूर्वीही दोघांनी अनेक मालिकांमध्ये एकत्र काम केले आहे. गेल्या १८ वर्षांत जेठालाल आणि बापूजी यांची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे.५० वर्षीय अमित भट्ट यांना ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली. त्यांनी दिलीप जोशी यांच्यासोबत ‘एफआयआर’सारख्या लोकप्रिय मालिकेतही काम केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अमित भट्ट यांना एका भागासाठी ८० हजार रुपये मानधन मिळते.