नागपूर,
guru disciple relationship गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नसून जीवनाला योग्य दिशा दाखविणारा दीपस्तंभ असतो. गुरुपौर्णिमेचा पवित्र दिवस हा ज्ञान, संस्कार आणि मूल्यांची शिकवण देणाऱ्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो. भारतीय संस्कृतीत गुरूला अनन्यसाधारण स्थान देण्यात आले आहे. आयुर्वेद क्षेत्रातील डॉ. संतोष सूर्यकांत पुसदकर यांच्या यशस्वी वाटचालीत त्यांचे गुरु डॉ. समीर गोविंद जमदग्नी यांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले आहे. गुरुंच्या सान्निध्यातून मिळालेले ज्ञान, संशोधनाची दृष्टी, चिकित्सेतील बारकावे आणि रुग्णसेवेची निष्ठा यांच्या बळावर डॉ. पुसदकर यांनी आयुर्वेद क्षेत्रात उल्लेखनीय कार्य उभे केले आहे.

गुरू हे केवळ शिक्षण देत नाहीत, तर शिष्यामध्ये आत्मविश्वास, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेची भावना निर्माण करतात. गुरूंच्या मार्गदर्शनातून शिष्याचे व्यक्तिमत्त्व घडते आणि त्याच्या यशाचा मार्ग अधिक प्रशस्त होतो. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने डॉ. संतोष पुसदकर यांनी आपल्या आदरणीय गुरु डॉ. समीर गोविंद जमदग्नी यांना विनम्र अभिवादन केले. तसेच त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर मार्गदर्शन लाभावे, अशी सदिच्छा व्यक्त केली.
सौजन्य: निकिता लुटे, संपर्क मित्र