सीसीटीव्हीत कैद चोरट्यांचा धुमाकूळ

व्यापाऱ्यांची झोप उडाली : आता सुपर बाजारवर चोरट्यांची नजर

    दिनांक :29-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
thieves-rampage-caught-on-cctv : यवतमाळ शहरात चोरीच्या घटनांनी व्यापाèयांची चिंता वाढली असून, आता चोरट्यांनी स्टेट बँक चौकातील सुपर बाजारलाही लक्ष्य केले आहे. मध्यरात्री एका चोरट्याने सुपर बाजार परिसरात तब्बल तीन तास धुडगूस घालत अनेक दुकानांचे शटर उघडण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेèयात कैद झाला असून, व्यापाèयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
 
y29July-C-C-T-V
 
 
 
सोमवारी रात्री सुमारे 12 पासून पहाटे 3 वाजेपर्यंत चोरटा सुपर बाजार परिसरात बिनधास्त फिरत होता. त्याने एकामागोमाग अनेक दुकानांचे शटर उचकटण्याचा प्रयत्न केला. मात्र, शटर मजबूत असल्याने त्याला चोरी करण्यात यश आले नाही. त्यामुळे मोठी चोरी टळली असली तरी व्यापाèयांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाली असून, त्याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
 
 
शहरातील अत्यंत वर्दळीच्या आणि महत्त्वाच्या व्यापारी भागात चोरटा एवढ्या वेळ मुक्तपणे वावरत असल्याने पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, गेल्या महिनाभरात जिल्ह्यात सराफा दुकानांवरील मोठ्या चोरीच्या घटनांनी खळबळ उडवली आहे. मोहदा येथे सराफा दुकान फोडून सुमारे 97 लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. त्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अद्याप फरार असतानाच बाभुळगाव येथेही सराफा दुकान फोडून 18 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
 
 
या सलग घटनांनंतर आता सुपर बाजारवरही चोरट्यांनी डोळा ठेवल्याने व्यापाèयांची झोप उडाली आहे. व्यापाèयांनी शहरात रात्रीची गस्त अधिक प्रभावी करावी, संशयितांवर कठोर कारवाई करावी आणि व्यापारी भागात सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी, अशी मागणी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.