मालेगाव,
Amani तालुयातील अमानी येथील एका शेतकर्याच्या गोठ्यातून तीन शेळ्या, चार बोकड व शेळीचे पिल्लू चोरुन नेल्याची घटना १ जुलै च्या रात्री घडली. याबाबत पशु मालकाने मालेगाव पोस्टे ला दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तालुयातील अमानी येथील शेतकरी संदीप सुभाष माने यांच्या मालकीच्या त्यांच्या घरासमोर असलेल्या गोठ्यात बांधलेल्या चार शेळ्या, तीन बोकड व एक पिल्लू असे एकूण अंदाजे साठ हजार रुपये किमतीचे पशुधन अज्ञात चोरांनी चोरुन नेले. याबाबत शुभम माने यांनी मालेगाव स्टेशनला तक्रार दिली आहे. त्यावरुन अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास मालेगाव पोलिस करीत आहेत. बकर्या चोरट्यांचा पोलीसांनी शोध घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी शेळी मालकांनी केली आहे.
आज, ३ जुलै रोजी मालेगाव स्टेशनचे ठाणेदार सह दोन पोलिस कर्मचार्यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा करून पाहणी केली असता राजू गवळी यांच्या घरावर लावलेल्या सीसी कॅमेर्यामध्ये चारचाकी गाडीसह चोरांचे काही फुटेज आढळल्याने तपासाला गती मिळून लवकरच चोरांचा तपास लावण्यात येईल, अशी माहिती ठाणेदार राजेश खेरडे यांनी दिली.