ॲरॉन फिंचचा न तुटलेला रेकॉर्ड!

    दिनांक :03-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
aaron finchs टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम बनतात आणि मोडले जातात, मात्र काही विक्रम असे असतात की ते वर्षानुवर्षे अबाधित राहतात. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि आक्रमक फलंदाज ॲरॉन फिंच याने २०१८ मध्ये उभारलेला एक ऐतिहासिक विक्रम आजही तसाच कायम आहे. ३ जुलै २०१८ रोजी झिम्बाब्वेविरुद्ध हरारे येथे खेळताना फिंचने अवघ्या ७६ चेंडूंमध्ये १७२ धावांची तुफानी खेळी साकारली होती. त्या ऐतिहासिक डावात फिंचने १६ चौकार आणि १० षटकारांची आतषबाजी करत २२६.३१ च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला. विशेष म्हणजे हा विक्रम आजही कोणालाही मोडता आलेला नाही.

aaron finchs
या विक्रमाला आता आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. दरम्यान अनेक फलंदाजांनी मोठमोठे डाव खेळले, पण फिंचच्या विक्रमाच्या जवळ फारच कमी खेळाडू पोहोचू शकले. २०२६ मध्ये हमजा खानने नाबाद १६४ धावांची दमदार खेळी करत हा विक्रम मोडण्याच्या दिशेने वाटचाल केली होती. मात्र, तोही फिंचच्या विक्रमापर्यंत पोहोचू शकला नाही. टी-२० क्रिकेटमधील एकूण सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम मात्र ख्रिस गेल यांच्या नावावर आहे. त्यांनी २०१३ मध्ये इंडियन प्रीमियर लीग मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू कडून खेळताना वॉरियर्सविरुद्ध नाबाद १७५ धावा केल्या होत्या. मात्र, तो विक्रम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नसल्याने टी-२० आंतरराष्ट्रीय सर्वोच्च धावसंख्येचा मान अजूनही फिंचकडेच आहे.
आजच्या काळात जवळपास दररोज टी-२० सामने खेळले जात असले तरी फिंचचा हा विक्रम अजूनही अबाधित आहे. यावरून हा टप्पा गाठणे किती अवघड आहे, याची कल्पना येते. फिंचने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याचा हा विक्रम अजूनही तितकाच भक्कम आहे. भविष्यात जो खेळाडू हा विक्रम मोडेल, त्याच्यासाठी ती एक ऐतिहासिक आणि मोठी कामगिरी ठरणार आहे.