वर्धा,
Kisan Morcha पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपा किसान मोर्चा वर्धा जिल्ह्याच्या वतीने सेंद्रिय शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा वर्धा जिल्हाध्यक्ष संजय गाते होते. कार्यशाळेचे उद्घाटन अर्चना वानखेडे यांनी केले. यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, ज्येष्ठ नेते जयंत कावळे, शेतकरी नेते प्रशांत इंगळे तिगावकर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यशाळेत प्रवीण महाराज देशमुख, नंदकिशोर गावंडे, दीपक तिरुपतकर यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व विशद करीत गो-पालनाचे महत्त्व समजावून सांगितले. याप्रसंगी प्रगतिशील शेतकरी जयंत येरावार यांनी गो-पालनासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.
किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष माधव वानखेडे यांनी प्रास्ताविक तर गुलाब राऊत यांनी संचालन केले. कार्यक्रमाला वर्धा जिल्ह्यातील सेंद्रिय शेती करणारे शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.