जम्मू,
CRPF vehicle overturns near Atal Tunnel जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील सोनमर्ग अटल बोगद्याजवळ केंद्रीय राखीव पोलीस दलाचे वाहन अपघातग्रस्त झाले. जवानांना घेऊन जाणारे हे वाहन रस्त्यावरून घसरून उलटल्याने सहा जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात तातडीने बचावकार्य राबविण्यात आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सचे वाहन मध्य काश्मीरमधील श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना सोनमर्ग बोगद्याजवळ नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या दुर्घटनेत सहा जवान जखमी झाले. अपघातानंतर जखमी जवानांना घटनास्थळीच तातडीने प्रथमोपचार देण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना गुंड येथील सीआरपीएफ छावणीत हलविण्यात आले. सर्व जवानांची प्रकृती स्थिर असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.