रस्ता दुरूस्तीसाठी डोरलीत रास्ता रोको

पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे

    दिनांक :03-Jul-2026
Total Views |
वर्धा,

Dorli देवळी तालुक्यातील डोरली येथील संतप्त ग्रामस्थांनी रस्ता दुरूस्तीच्या मागणीसाठी शुक्रवार ३ रोजी रास्तारोको आंदोलन केले. यावेळी जड वाहतुकीमुळे खराब झालेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी आंदोलनकत्र्यांनी केली.
 

Dorli  
डोरली गावाजवळ गिट्टी खदान आहे. याच ठिकाणाहून अवजड वाहनांमध्ये गिट्टी भरून नियोजित ठिकाणी नेली जाते. त्यामुळे डोरली रस्ता अवजड वाहतुकीमुळे पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. या मार्गावरील जीवघेणे खड्डे रात्रीच्या सुमारास वाहन चालकांना सहज दिसत नसल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. या मार्गाने ये-जा करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे जीवघेणा ठरणारा हा मार्ग तातडीने दुरूस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली. आंदोलनाची माहिती मिळताच पुलगावचे ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्या मार्गदर्शनात पुलगाव पोलिसांचे पथक आंदोलनस्थळी पोहोचले. पोलिसांनी आंदोलनकत्र्यांची मागणी जाणून घेत संबंधित विभागाला याची माहिती दिली. सकारात्मक चर्चा आणि पोलिसांच्या मध्यस्थीने नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर या मार्गावरील ठप्प पडलेली वाहतूक सुरळीत करण्यात आली.
आंदोलनात ज्ञानेश्वर मोहिते, अमोल गोंडाणे, सुरेश चांभारे, भास्कर चांभारे, विक्की गोंडाणे, संदेश जारुंडे, प्रशिक पाटील, स्वप्नील गोंडाणे, अजय मोहिते, मनोज मोहिते, महेश गायकी, अविनाश गोंडाणे, राहुल मोहिते, राम घरकेले, विकी भगत, आदी सहभागी झाले होते.