तीन वाहनांच्या भीषण अपघातात वृद्धाचा मृत्यू : एक गंभीर

- देवरी-चिचगड मार्गावरील सालई परिसरातील घटना

    दिनांक :03-Jul-2026
Total Views |
गोंदिया,
Road Accident जिल्ह्यातील देवरी-चिचगड मार्गावरील सालई परिसरात ट्रक, पिकअप आणि दुचाकी यांच्यात विचित्र अपघात होऊन एका वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी 2 जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली. लक्ष्मणराव राऊत रा. साखरीटोला, ता. आमगाव असे मृताचे नाव असून महेश कावळे रा. रिसामा, ता. आमगाव असे गंभीर जखमीचे नाव आहे.
 

Elderly Man Dies in Road Accident on Deori–Chichgad Route; One Seriously Injured in Multi-Vehicle Crash 
मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मणराव राऊत आणि महेश कावळे हे दुचाकीने देवरीहून चिचगडकडे जात असताना त्यांच्या पुढे ट्रक त्याच दिशेने जात होता. त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणार्‍या पिकअप चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. पिकअपने प्रथम ट्रकला धडक देत ट्रकच्या मागे असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. अपघातात लक्ष्मणराव राऊत यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. तर महेश याचेवर उपचार सुरू आहे. याप्रकरणी देवरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.