अतिवृष्टीमुळे ६ गावातील १६ कुटूंब बाधित

२१ जनावरांचा मृत्यू

    दिनांक :03-Jul-2026
Total Views |
वर्धा,
Heavy Rain in Wardha गुरुवार २ रोजी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सहा गावांतील १६ कुटूंबं बाधित झाले असून २१ जनावरांचा मृत्यू झाला आहे़ काही ठिकाणी नाल्यालगतच्या शेतातील पिकांचेही नुकसान झाले आहे़


Kolhapur rain
गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे़ आर्वी तालुक्यात ६३.६ मि.मी, कारंजा ५८.३ मिमी, आष्टी तालुक्यात ७९ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. या अतिवृष्टीमुळे आर्वी, कारंजा व आष्टी तालुक्यात माेठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे आर्वी तालुक्यातील २ गावांतील ७ कुटूंब बाधित झाले तर ७ घरात पाणी शिरून नुकसान झाले आहे. आष्टी तालुक्यातील २ गावांतील ७ कुटूंब बाधित झाले आहे. २० मोठी व १ लहान अशी २१ जनावरे मृत पावली. २ घराचे अंशत: नुकसान झाले आहे. कारंजा तालुक्यातील २ गावातील २ कुटूंब बाधित झाले तर २ घराचे अंशत: नुकसान झाले आहे. तसेच हिंगणघाट येथे ३ घरात पाणी शिरून नुकसान झाले आहे.