केशव भगत वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने सन्मानित

    दिनांक :03-Jul-2026
Total Views |
मंगरूळनाथ,
Vasantrao Naik Sheti Nisht सामाजिक उपक्रमासह शेतीत विविध प्रयोग करून भरघोस उत्पन्न हे शेतकर्‍यांसाठी प्रेरणादायी ठरलेले मंगरूळनाथ तालुयातील चांभई येथील प्रयोगशील शेतकरी केशव मोतीराम भगत यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार बुधवारी १ जुलै रोजी राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
 

Keshav Bhaghat Honoured with Vasantrao Naik Sheti Nisht Farmer Award in Maharashtra 
 
मुंबई येथे पार पडलेल्या सभागृहात राज्यपाल विष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस तसेच कृषिमंत्री वाशीम जिल्हा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते प्रगतिशील शेतकरी केशव भगत यांना सपत्नीक पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री रामकृष्ण विखे पाटील, राज्यमंत्री इंद्रनिल नाईक, अ‍ॅड. आशिष जयस्वाल, भरत गोगावले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
केशव भगत यांच्याकडे शेतीचे क्षेत्र मर्यादित असले तरी आता परिश्रम व आधुनिक शेतीतील विविध प्रयोगाच्या बळावर त्यांनी आतापर्यंत उत्पन्न घेण्यात यश मिळवले असून, त्यांनी अमरपट्टा सोयाबीन व तूर लागवड तंत्र विकसित करून हे तंत्रज्ञान सर्व शेतकर्‍यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले या तंत्राचा सर्व प्रसार व प्रचार केला त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी भरघोस उत्पन्न घेतले. यावेळी मनोगत व्यक्त करताना भगत म्हणाले,आपण आपल्या मातीशी आणि कार्याप्रति प्रामाणिक असलो तरी त्याची दखल कुठेतरी घेतली जाते त्यामुळे हा सन्मान केवळ माझा नसून संपूर्ण शेतकरीबांधव व कृषी विभाग समुदायाचा आहे.