फिफा विश्वचषकादरम्यान पॅलेस्टिनी फुटबॉलपटूची हत्या

    दिनांक :03-Jul-2026
Total Views |
पॅलेस्टाईन,
Killing of Palestinian footballer फिफा विश्वचषक २०२६ स्पर्धेदरम्यान फुटबॉल विश्वातून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. ३२ वर्षीय पॅलेस्टिनी फुटबॉलपटू सलीम खादेर अल-अश्कर यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर फुटबॉल वर्तुळात शोककळा पसरली असून अनेक स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. पॅलेस्टाईन फुटबॉल असोसिएशनने सलीम अल-अश्कर यांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी केली आहे. सलीम हे सलीम खान युनिस सर्व्हिसेस क्लबसंघाकडून गोलकीपर म्हणून खेळत होते आणि स्थानिक फुटबॉल वर्तुळात त्यांची ओळख एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून होती.
 

सलीम अल-अश्कर 
 
माहितीनुसार, अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच सलीम यांचा विवाह झाला होता. त्यांच्या निधनाच्या वेळी त्यांची पत्नी गर्भवती असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. पॅलेस्टाईन फुटबॉल असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, सलीम हे सात बहिणींचे एकमेव भाऊ होते. त्यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. आपल्या पहिल्या अपत्याला पाहण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याने परिस्थिती अधिक वेदनादायक ठरली आहे. दरम्यान, पॅलेस्टाईनचा फुटबॉल संघ यंदाच्या फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरू शकला नाही. आशियाई पात्रता फेरीत अपेक्षित कामगिरी न झाल्याने संघाला स्पर्धेबाहेर राहावे लागले.