नराधमास आजीवन कारावास

    दिनांक :03-Jul-2026
Total Views |
वर्धा,
Heinous Offender ७ वर्षाच्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य करून त्याचा खून करणारा आरोपी विशाल जोगदंड (२६) रा. तारफैल, वर्धा याला आजीवन कारावासाची शिक्षा व दंड ठोठावला. हा निर्वाळा येथील जिल्हा न्यायाधीश-३ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जे. अंसारी यांनी दिला.
 

nagpur crime Husband Booked for Allegedly Forcing Wife to Convert Religion After Love Marriage 
साक्षीदार कृष्णा डोळे व गौतम हे त्यांच्या घरासमोर उभे होते. तर आरोपी विशाल जोगदंड हा एका लहान मुलाला खांद्यावर घेऊन मॉडेल शाळेकडून येताना दिसला. यामुळे त्यांनी विचारपूस केली असता आरोपीने माझा भाचा असल्याचे सांगितले. त्याने मुलाला चॉकलेट देऊन झोपडीत घेऊन गेला. थोड्या वेळातच घरा शेजारी राहणारी जया नाडे हिला झोपडीतून लहान मुलाचा रडण्याचा आवाज आल्यामुळे तिने दरवाजा ठोठावला, परंतु आरोपीने दरवाजा उघडला नाही. काही वेळाने आरोपी त्या महिलेला धक्का मारून पळून गेला. कृष्णा डोळे, मनोज कसबे, पौर्णिमा राखडे, मुन्नी राखडे, गौतम हातागडे यांनी आरोपीच्या घरात जाऊन बघितले असता झोपडीमध्ये लहान मुलगा दिसला नाही. तिथे मुलाचे कपडे पडून होते. पाहणी केली असता झोपडीच्या बाजूला असलेल्या टाकीत मुलाचा मृतदेह आढळला. पंचमानादरम्यान आरोपीने मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याचा खून केल्याचे स्पष्ट झाले. तक्रारीवरून वर्धा शहर पोलिसांनी गुन्हा नोंद केला. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप यांनी केला. आरोपीने गुन्हा केल्याचा पुरावा उपलब्ध झाल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील विनय घुडे यांनी कामकाज पाहिले. अॅड. स्वाती गेडे यांनी त्यांना मदत केली. पैरवी अधिकारी राहुल पुरी यांनी साक्षीदारांना हजर करून मोलाची कामगिरी बजावली. या प्रकरणात शासनातर्फे १३ साक्षीदार तपासले. आरोपीस वरील प्रमाणे शिक्षा सुनावली.