मोरया फाउंडेशनचा ‘सखी उत्सव’ उत्साहात

    दिनांक :03-Jul-2026
Total Views |
नागपूर,
morya-foundations : मोरया फाउंडेशनतर्फे वटसावित्री पौर्णिमेनिमित्त महिलांसाठी ‘सखी उत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तिरंगा चौक येथील लौंदे ज्वेलर्समध्ये झालेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
 
 
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. प्रमुख पाहुण्या कल्पना पराते व मनीषा उमरेडकर यांचे स्वागत करण्यात आले. संस्थापिका रजनी अविनाश चौहान यांनी वटसावित्री पौर्णिमेचे महत्त्व सांगून महिलांमध्ये सांस्कृतिक जाणीव व परंपरांचे जतन करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. उत्सवात एक मिनिट गेम्स, म्युझिकल चेअर, उखाणा स्पर्धा आणि नृत्य सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. पारंपरिक वेशभूषेतील महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम उत्साहात पार पडला.
 
 
सौजन्य: रजनी चौहान, संपर्क मित्र