पत्नीचे बळजबरी धर्मांतरण करण्याचा प्रयत्न

पतीविरुद्ध शांतीनगरात गुन्हा दाखल

    दिनांक :03-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
nagpur crime प्रेमविवाह केल्यानंतर सुरळीत संसार सुरु असताना पतीने पत्नीचे बळजबरी धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला. पतीकडून होणारा मानसिक आणि शारीरिक छळ सहन न झाल्यामुळे पत्नीने पोलिसात धाव घेतली. शांतीनगर पोलिसांनी तक्रारीवरुन पतीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ८५ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
 

nagpur crime Husband Booked for Allegedly Forcing Wife to Convert Religion After Love Marriage 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्रनगरात राहणाऱ्या तक्रारदार महिलेने शांतीनगरात राहणाऱ्या एका इंटेरिअर डेकोरेशनचे दुकान असलेल्या दुकानदाराशी ओळख झाली. या महिलेची ओळखीनंतर दोघेही प्रेमात पडले. त्यांनी एकमेकांशी सामंजस्य ठेवून प्रेमविवाह केला. या दाम्पत्याला सध्या १० वर्षांचा मुलगा असून ते नरेंद्रनगर येथील निवासस्थानी एकत्र राहत होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद झाला. पतीने पत्नीकडून मोठी रक्कम उकळली आणि त्यातून प्रॉपर्टी विकत घेतली. त्यामध्ये वारसदार म्हणून पत्नीचे नावसुद्धा टाकले नाही. या वादानंतर महिलेवर पतीकडून धर्मांतरण करण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. महिलेने अनेकदा या प्रकाराला विरोध केला. लग्न करतानाच धर्मांतरण न करता पती-पत्नी म्हणून सोबत राहण्यावर दोघांनीह होकार दर्शविला होता. मात्र, आता महिलेला पती धर्मांतरण करण्यासाठी बळजबरी करीत होता. त्यासाठी महिलेला मानसिक व शारीरिक त्रास देत होता. पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नी शांतिनगर पोलिसांनी पतीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील सर्व बाबींची पडताळणी केली जात असून, तक्रारीतील आरोपांची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पत्नीवर धर्मांतरणासाठी बळजबरी करण्यात येत असल्याची महिलेची तक्रार आहे. तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.
- गजानन तामटे (ठाणेदार, शांतीनगर)