तेहरान,
red flag on Khamenei's catafalque इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंतिम निरोप सोहळ्याला शनिवार, ४ जुलैपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातील विविध देशांच्या नेत्यांची प्रतिनिधीमंडळे तेहरान येथे पोहोचू लागली आहेत. खामेनी यांची शवपेटी तेहरानमधील ग्रँड मसल्ला येथे विशेष मंचावर ठेवण्यात आली असून, त्यावर ठेवण्यात आलेल्या एका लाल ध्वजामुळे जागतिक स्तरावर मोठी चर्चा रंगली आहे. हा विशेष लाल ध्वज खामेनेई यांच्या मूळ गाव मशहद येथील इमाम रझा दर्ग्यामधून आणण्यात आला आहे. या ध्वजामागे केवळ धार्मिक नव्हे, तर मोठा राजकीय संदेश दडलेला असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

अमेरिकेतील जॉर्जटाउन विद्यापीठातील मध्य पूर्व आणि इस्लामिक राजकारणाचे अभ्यासक नादेर हाशेमी यांनी बोलताना सांगितले की, लाल ध्वज हा पैगंबर मुहम्मद यांचे नातू हुसेन इब्न अली यांच्या बलिदानाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे इराण खामेनेई यांच्या मृत्यूची तुलना कर्बलाच्या ऐतिहासिक शहादतीशी करत असल्याचे स्पष्ट संकेत मिळतात. सातव्या शतकात झालेल्या कर्बलाच्या लढाईत हुसेन यांचा मृत्यू झाला. खामेनी यांच्या अंत्यसंस्काराशी संबंधित सर्व कार्यक्रम ४ जुलै ते ९ जुलैदरम्यान पार पडणार आहेत. त्यांच्या अंत्ययात्रेचा मार्ग इराणमधील अनेक शहरांतून नेला जाणार आहे. यामागे खामेनी यांना शिया इस्लाममधील सर्वमान्य नेतृत्वाचे प्रतीक म्हणून अधिक दृढ करण्याचा प्रयत्न असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. सर्व धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी मशहदमध्ये दफन करण्यात येणार आहे.