सेफ्टीगिरी जिंदाबाद'चा प्रक्षेपण सोहळा उत्साहात

    दिनांक :03-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Road Safety Awareness रस्ते सुरक्षा जनजागृतीला चालना देण्याच्या उद्देशाने रोडमार्क फाऊंडेशनच्या पुढाकारातून निर्मित 'सेफ्टीगिरी जिंदाबाद' या जनजागृतीपर लघुपटाचा विशेष प्रक्षेपण सोहळा शंकरनगर येथील कन्सेप्ट अँड इव्हेंट्स हॉलमध्ये उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलिस उपायुक्त (वाहतूक) आदित्य मीरखेलकर होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर, तर विशेष अतिथी म्हणून डॉ. संयुक्ता थोरात, सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर, प्रदीप कुलकर्णी, मिलिंद देशकर, अरविंद पाटील, गोविंद बजाज यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

bink 
 
 
यावेळी लघुपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.Road Safety Awareness  रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन, जबाबदार वाहनचालक आणि सुरक्षित प्रवासाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा लघुपट तयार करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली स्क्रॅच टू स्केल मीडिया प्रा. लि.ने रस्ते सुरक्षा विषयक २० सेकंदांच्या चार जनजागृती जाहिरातींची निर्मिती केली असून त्यांचे प्रसारण दूरदर्शन सह्याद्रीवर सुरू झाले आहे.लघुपटाचे लेखन हर्षद सालपे, दिग्दर्शन समर बोबडे व पीयूष धूमकेकर यांनी केले आहे. 
सौजन्य: विजय जथे,संपर्क मित्र