कारंजा लाड,
Sahastrarashmi Pund कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आयपीआर मिशन टू यूके २०२६ या विशेष व्यावसायिक व अध्ययन मोहिमेसाठी एन्ड्युरन्स टेनॉलॉजीज लिमिटेडचे प्रमुख —सहस्त्ररश्मी आर. पुंड यांना निमंत्रण देण्यात आले आहे. सहस्त्ररश्मी हे कारंजा येथील दिवंगत ज्येष्ठ विधीज्ञ रामकृष्ण पुंड यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण जे.सी. हायस्कूल येथे झालेले असून ते अकोला येथून पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून पदवीधर आहेत. ही मोहीम ६ ते १० जुलै २०२६ दरम्यान युनायटेड किंगडममध्ये आयोजित करण्यात येणार असून, भारत व युनायटेड किंगडम यांच्यातील उद्योग, बौद्धिक संपदा आणि व्यावसायिक संबंध अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने विविध बैठका व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.
सीआयआय च्या यूके प्रमुख शेहला रझा हसन यांनी पाठविलेल्या निमंत्रण पत्रात पुंड यांच्या अनुभव व कौशल्याचा या मोहिमेत महत्त्वपूर्ण सहभाग राहणार असल्याचे नमूद केले आहे. या उपक्रमातून नवीन व्यावसायिक संधी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सहस्त्ररश्मी यांचेबौद्धिक संपदा हक्कांशी संबंधित विविध राष्ट्रीय कामांसाठी सहस्त्ररश्मी यांनी जपान, सिंगापूर, चीन, दुबई, दक्षिण आफ्रिका आणि मलेशिया यांसारख्या विविध देशांचा प्रवास केला आहे. सहभागामुळे पुन्हा एकदा मोठा सन्मान कारंजा शहरास प्राप्त झाला आहे.