हिंगणघाट
Scholarship Exam महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये तालुक्यातील शेगाव (कुंड) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्याथ्र्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून शाळा व गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अपूर्वा फुलझेले हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक, तर आर्यन हाडके याने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.