नागपूर,
Street food शहरातील रस्त्यांच्या कडेला उभ्या असलेल्या पाणीपुरी, चायनीज व अन्य खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अनेक ठिकाणी खाद्यपदार्थ उघड्यावर ठेवले जात असल्याने त्यावर धूळ, माशा व जिवाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अन्नातून होणाऱ्या आजारांचा धोका निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. Street food याशिवाय अनेक स्टॉल्स मुख्य रस्ते व फुटपाथवर अनधिकृतपणे उभे राहत असल्याने पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होतो आणि वाहतूक कोंडीची समस्याही वाढते.महानगरपालिका व अन्न व औषध प्रशासनाने अशा स्टॉल्सची नियमित तपासणी करून स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि आवश्यक परवान्यांची पडताळणी करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सौजन्य:संजय श्रौती ,संपर्क मित्र