वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणासाठी या खेळाडूची बळी!

    दिनांक :03-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Vaibhav Suryavanshi's debut भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता आता दुसऱ्या सामन्याकडे वळली आहे. ४ जुलै रोजी मँचेस्टर येथे होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यात युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी मिळणार का, याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.पहिला सामना न झाल्यामुळे वैभवच्या पदार्पणाची प्रतीक्षा वाढली आहे. संघ व्यवस्थापन आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर कोणत्या संयोजनासह मैदानात उतरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 
 
vaibhav suryavanshi
संघात बदल झाल्यास कोणत्या खेळाडूला बाहेर बसावे लागेल, यावरही चर्चा रंगली आहे. विशेषतः जू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्या नावांची चर्चा अधिक होत आहे. काही माजी खेळाडूंनी वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर संधी देण्याची बाजू मांडली आहे. संघाच्या संतुलनाचा विचार केला तर वैभव सूर्यवंशी सलामीवीर म्हणून भूमिका बजावू शकतो, तर संजू सॅमसन मधल्या फळीत किंवा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. मात्र, तिलक वर्माच्या सध्याच्या फॉर्ममुळे त्याच्या स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
 
 
आकडेवारीकडे पाहिल्यास, संजू सॅमसनने २४ डावांत १६९ च्या स्ट्राइक रेटने ५४४ धावा केल्या आहेत. दुसरीकडे, तिलक वर्माने २४ डावांत १४३ च्या स्ट्राइक रेटने ३४५ धावा केल्या आहेत. या आकडेवारीवरून फलंदाजीतील प्रभाव आणि सातत्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, खेळाडूंची निवड केवळ नाव किंवा प्रतिष्ठेवर नव्हे, तर सध्याचा फॉर्म, संघातील भूमिका आणि सामन्याची गरज यावर आधारित असावी. त्यामुळे मँचेस्टरमधील दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडिया कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह उतरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ४ जुलै रोजी मैदानावर उतरणाऱ्या अंतिम संघात वैभव सूर्यवंशीला संधी मिळते का, आणि त्यासाठी कोणाला बाहेर बसावे लागते, याकडे आता सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.