वर्धेत निघाला तरुणांचा पावसात मोर्चा

एमपीएससी ऑनलाईन परीक्षेला विरोध जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन

    दिनांक :03-Jul-2026
Total Views |
वर्धा
MPSC एमपीएससी संयुक्त गट क परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या निर्णयाविरोधात शुक्रवार, ३ जुलैला स्पर्धा परीक्षा विद्यार्थी कृती समितीच्या नेतृत्त्वात तरुण-तरुणींनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात झाला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे सादर केले.
 

 

Wardha Students Protest in Rain Against MPSC Online Exam Decision; Submit Memorandum to Collector
एमपीएससी संयुक्त गट क परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावी. परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व विद्यार्थी हिताचीच असावी. टीईटी पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. नीट पेपर फुटीची नैतिक जबाबदारी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी स्विकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. टीईटी पेपर फुटी प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी या हेतूने हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे, आदी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या.
शिवाजी महाराज पुतळा चौकातून निघालेला मोर्चा सोशालिस्ट चौक, बजाज चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळा चौक, झाशी राणी पुतळा चौक मार्गक्रमण करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात धडकला. या ठिकाणी मोर्चाचे विसर्जन झाले. यावेळी काही तरुण, तरुणींनीही आपल्या भावना व्यक्त करीत सरकारच्या विद्यार्थी व जनसामान्य विरोधी धोरणांचा निषेध केला. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन आंदोलनकत्र्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांच्या माध्यमातून राष्ट्रपती व राज्यपालांना पाठविले. आंदोलनाचे नेतृत्व नितेश कराळे, इंद्रजित वाघमारे, अमित कावडकर, प्रफुल्ल गेडाम यांनी केले.