लहान आर्वीचे उपसरपंच भाजपाचे सागर नागापुरे

    दिनांक :30-Jul-2026
Total Views |
तळेगाव (श्या.पं.)
sagar nagapure लहान आर्वी ग्रापंच्या उपसरपंचपदी भाजपाचे सागर नागापुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.ग्रापं कार्यालयात झालेल्या विशेष सभेत अध्यासी अधिकारी तथा सरपंच सुनील साबळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि निवडणूक निरीक्षक नायब तहसीलदार, ओमप्रकाश बाळस्कर आणि ग्रापं अधिकारी अनुराधा धारपुरे यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली.
 

sagar nagapure 
लहान आर्वी ग्रा.पं.ची सार्वत्रिक निवडणूक ऑक्टोबर २०२३ मध्ये होऊन उपसरपंचपदाची निवडणूक २९ डिसेंबर २०२३ रोजी झाली होती, तेव्हा भाजपाचे गटनेते काशिनाथ देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गटाच्या बैठकीत उपसरपंचपदासाठी दोन नावे आल्याने ईश्वर चिठ्ठीने अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरविण्यात आला होता. त्यानुसार प्रथमत: ईश्वरचिठ्ठी निघालेले आणि अडीच वर्षे उपसरपंचपदाची धुरा सांभाळणारे अमोल होले यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी २८ जुलै रोजी सरपंच साबळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रा.पं. कार्यालयात उपसरपंच निवडणूक पार पडली. यावेळी सागर नागापुरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.