तीन सावकारांवर गुन्हा दाखल

शेतकरी आत्महत्या प्रकरण, सावकार झाले फरार

    दिनांक :30-Jul-2026
Total Views |
मोर्शी,
case-registered-against-moneylenders : मोर्शी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील तरोडा डोमक येथे २५ जुलै रोजी सावकाराच्या त्रासाला कंटाळून पवन विश्वासराव भाकरे या शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. त्यांनी मृत्यूपूर्वी पत्र लिहून ठेवले होते. पत्रात अवैधरीत्या सावकारी करणाऱ्या तीन सावकारांचे नाव नमूद होते.
 
 

J 
 
 
 
मोर्शी पोलिसांनी या प्रकरणी ३० जुलै रोजी कैलास सारडा, नवनीत चांडक, घनश्याम गट्टानी यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. मृतक पवन भाकरे यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतील मजकूर व इतर पुराव्यांच्या आधारे या सावकारांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली. दरम्यान, हे तिन्ही सावकार फरार असून, मोर्शी पोलिस शोध घेत आहेत.
 
 
मोर्शी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कोणत्याही नागरिकाची या सावकारांनी शेती लिहून घेतली असेल अथवा व्याजाने पैसे देऊन अधिक व्याज वसूल केले असेल तसेच इतर मालमत्ता लिहून घेतली असेल किंवा कोरा धनादेश, कोरा स्टॅम्पवर सही घेतली असेल तर नागरिकांनी पोलिस ठाण्यात येऊन अथवा दुरध्वनीद्वारे अथवा लिखित तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक राहुल आठवले यांनी केले आहे.