चुलबंद नदीला उधाण; दांडेगाव–मांडळ मार्गावरील पुलावरून पाणी

प्रशासनाकडून वाहतूक टाळण्याचे आवाहन

    दिनांक :30-Jul-2026
Total Views |
लाखांदूर
chulband river floods भंडारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. लाखांदूर–साकोली चुलबंद खोऱ्यात बुधवार (२९ जुलै) रोजी मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे चुलबंद नदीला मोठा पूर आला आहे. या पुरामुळे दांडेगाव–मांडळ मार्गावरील पुलावरून पाण्याचा तीव्र प्रवाह वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे खोळंबली असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने वाहतूक टाळण्याचे कडक आवाहन केले आहे.
 
chulband river floods in lakhandur as water flows over dandegaon mandal bridge, administration issues warning
 
ता.29 जुलै च्या मध्यरात्री झालेल्या धुवांधार पावसामुळे चुलबंद नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाली.तर तालुक्यातील दांडेगाव–मांडळ पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे.पुराचे पाणी पुलावर आल्याने परिसरातील काही गावांचा संपर्क तात्पुरता विस्कळीत झाला आहे.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली असून त्यांनी नागरिकांना खालील सूचना दिल्या आहेत
 
 
पुलावरून जाणे टाळा: पुलावरून पाणी वाहत असताना वाहन चालवणे किंवा पायी प्रवास करणे अत्यंत धोकादायक असल्याने कोणीही असा धाडसी प्रयत्न करू नये.पूरग्रस्त भागात जाऊ नका:विनाकारण पुराचे पाणी पाहण्यासाठी किंवा व्हिडिओ बनवण्यासाठी पूरग्रस्त भागात गर्दी करू नका.तात्काळ संपर्क करा:कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासन किंवा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी तात्काळ संपर्क साधावा.
 
हवामान खात्याने जिल्ह्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नदीकाठच्या व सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करावे.