दादीबाई देशमुख शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात

    दिनांक :30-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Dadibai Deshmukh School श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, महाल येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी गीत, भाषणे, कविता व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले.
 
45
 
 
कार्यक्रमात 'प्रथम गुरु आपले पालक' या संकल्पनेतून पालकांचे पाद्यपूजन करण्यात आले. मुख्याध्यापिका माया बमनोटे यांनी विद्यार्थ्यांना गुरुंच्या मार्गदर्शनाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाला गुरुजन यशोधन कारकर, धनश्री कारकर तसेच संस्थेच्या अध्यक्षांच्या प्रतिनिधी सीमा फडणवीस उपस्थित होत्या. सूत्रसंचालन विद्यार्थिनी मुग्धा बोकडे हिने केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
सौजन्य: माया बमनोटे ,संपर्क मित्र