डॉ. आंबेडकर महाविद्यालयात राठोड कुटुंबीयांचा सत्कार

    दिनांक :30-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Dr. Ambedkar College दीक्षाभूमी डॉ. आंबेडकर महाविद्यालयात बारावीची विद्यार्थिनी दिपाली राठोड, अकरावीची विद्यार्थिनी अंजली राठोड तसेच त्यांचे पालक श्रीपत राठोड व जयश्री राठोड यांचा प्राचार्या डॉ. दीपा पान्हेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

907 
 
 
राठोड कुटुंबाने मनीष नगर येथील आपल्या घराच्या छतावर 'श्री वसंतराव नाईक परसबाग' विकसित करून औषधी व उपयुक्त वनस्पतींचे संवर्धन केले आहे. या पर्यावरणपूरक उपक्रमाची दखल घेत महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच परसबागेला भेट दिली होती.यावेळी विद्यार्थिनी अंजली राठोड हिने काढलेले मंत्री बावनकुळे यांचे हस्तचित्रही सादर करण्यात आले. राठोड कुटुंबाच्या या उपक्रमाचे महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.
सौजन्य:प्रफुल ब्राम्हणे,संपर्क मित्र