पोलिसांसाठी मोफत दंत तपासणी शिबिर

    दिनांक :30-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर,
free-dental-check-up-camp : शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर आणि हर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सक्करदरा पोलिस स्टेशनमध्ये पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मोफत दंत तपासणी व आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. शिबिरात शासकीय दंत महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अनिकेत थोटे, डॉ. मारुती मसल, डॉ. श्रेया जैन तसेच पाच सदस्यीय दंत वैद्यकीय पथकाने पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची दंत तपासणी केली.
 
 
 
JLK
 
 
 
यावेळी दंत स्वच्छता, तोंडाच्या आरोग्याची योग्य काळजी, नियमित दंत तपासणीचे महत्त्व तसेच आवश्यक उपचारांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरादरम्यान अनेक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये दात व हिरड्यांशी संबंधित विविध समस्या आढळून आल्या. संबंधितांना पुढील उपचारांचा सल्ला देण्यात आला असून तोंडाच्या आरोग्याकडे नियमित लक्ष देण्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन पोलिस उपायुक्त रश्मिता राव यांच्या मार्गदर्शनात सक्करदरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार रमेश खुणे, पोलिस उपनिरीक्षक अश्विनी कात्रे आणि नेहा बाजपेयी यांनी केले.
 
शिबिराला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा आरोग्यविषयक जनजागृती व तपासणी शिबिरांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.