नागपूर,
Gajanan Nagar Narendra Nagar मुसळधार पावसामुळे गजानन नगरच्या मागील भागातील नरेंद्र नगर फुलाजवळ पाणी साचून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. परिसरात सुरू असलेल्या पाइपलाइनच्या कामामुळे पाण्याचा निचरा न झाल्याने पावसाचे पाणी थेट मनोहर तारसेकर यांच्या घरात शिरले. घरातील खोलीपर्यंत पाणी आल्याने त्यांचे नुकसान झाले.
नागरिकांनी संबंधित विभागाने तातडीने निचऱ्याची व्यवस्था करून पाइपलाइनचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे.
सौजन्य : सुरेश चव्हारे ,संपर्क मित्र