मुंबई
gautami kapoor नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘लॉक अप २’ आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्रत्येक भागासह नव्या वादांना आणि नाट्यमय घडामोडींना अधिकच उधाण आले आहे. रितेश देशमुख आणि फराह खान सूत्रसंचालन करत असलेल्या या शोच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या ‘फॅमिली स्पेशल’ भागात घडलेल्या एका प्रसंगाने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
या विशेष भागात स्पर्धकांना भेटण्यासाठी त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र शोमध्ये सहभागी झाले होते. अभिनेता राम कपूरला भेटण्यासाठी त्याची पत्नी आणि अभिनेत्री गौतमी कपूरही घरात आली. मात्र, पतीची भेट घेण्यापूर्वीच तिने सर्वांसमोर स्पर्धक श्रेया कालराची हात जोडून माफी मागितल्याने उपस्थितांनाही आश्चर्याचा धक्का बसला.गौतमी कपूर म्हणाली, “रामच्या वागण्यामुळे तुम्हाला वाईट वाटलं असेल, त्याने अयोग्यरित्या स्पर्श केला असेल किंवा वारंवार किस घेऊन तुला अस्वस्थ केलं असेल, तर मी त्याच्या वतीने तुझी माफी मागते.”यानंतर तिने घरातील इतर महिला स्पर्धकांकडे वळूनही दिलगिरी व्यक्त केली. “राममुळे कोणत्याही महिलेला अस्वस्थ वाटलं असेल, तर मी त्याच्या वतीने माफी मागते. मी त्याच्या वागण्याचं समर्थन करत नाही. पण तो स्वभावाने अगदी टेडी बेअरसारखा आहे,” असेही गौतमीने स्पष्ट केले.या घटनेची पार्श्वभूमी काही दिवसांपूर्वी घडलेल्या वादाशी संबंधित आहे. शोदरम्यान श्रेया कालराने राम कपूरच्या वारंवार मिठी मारण्याच्या तसेच कपाळावर आणि गालावर किस घेण्याच्या सवयीमुळे आपण अस्वस्थ झाल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. पुन्हा अशी वेळ आल्यास आपण त्याला थेट थांबवू, असेही तिने नमूद केले होते.
याशिवाय, दुसरी स्पर्धक gautami kapoor अपूर्वा मखिजा हिनेही राम कपूरच्या वागण्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्याच्या वारंवार किस करण्याच्या कृतीमुळे आपल्याला त्रास होत असल्याचे तिने सांगितले होते. या संपूर्ण प्रकरणानंतर सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून अनेकांनी या विषयावर विविध प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.दरम्यान, ‘लॉक अप २’चा ग्रँड फिनाले ५ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. अंतिम फेरी जवळ येत असताना घरातील वाद अधिक तीव्र होत असून विजेतेपद कोण पटकावणार, याबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.