महाराष्ट्रातील एकमेव बृहस्पती मंदिरात गुरुपौर्णिमा महोत्सव

    दिनांक :30-Jul-2026
Total Views |
सेलू,
gurupurnima festival तालुयाच्या सीमेवरील आणि हिंगणा वनपरिक्षेत्राजवळील श्रीक्षेत्र चौकी येथील महाराष्ट्रातील एकमेव प्रसिद्ध बृहस्पती गुरुपौर्णिमा महोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाच्या वातावरणात साजरा झाला. महाराष्ट्रासह विदर्भातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या हजारो भाविकांनी बृहस्पती महाराजांचे दर्शन घेत गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.
 

gurupurnima festival celebrated at maharashtra 
गुरुपौर्णिमानिमित्त मंदिर परिसरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. दिवसभर अभिषेक, विशेष पूजन, आरती, भजन, कीर्तन, नामस्मरण आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मंदिर प्रशासन व स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने महोत्सवाचे नियोजन करण्यात आले होते.
बृहस्पती मंदिराला महाराष्ट्रातील दुर्मिळ आणि विशेष धार्मिक महत्त्व लाभले असून दरवर्षी गुरुपौर्णिमेला येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. यंदाही मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून गुरूंचे आशीर्वाद घेतले आणि मंदिर परिसर जय गुरुदेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला.उत्सवानंतर काही भाविकांनी मंदिर परिसरातील रस्ते, प्रकाशव्यवस्था आणि वाहतूक नियोजनात आणखी सुधारणा करण्याची अपेक्षा व्यत केली.